पान दोन मेन
--------------------
08328, 08327
बारशिंगवे : खरीपपूर्व हंगाम नियोजनासाठी बैलांच्या सहायाने जमिनीची मशागत करताना शेतकरी.
खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु
इगतपुरी तालुक्यातील १३० गाव खरीप हंगामासाठी निश्चित
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.२६ : यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी व भात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरु झाली असून शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीफण, पांबर, कोळप आदी पारंपारिक औजारे कुशल कारागिरांकडून बनवले जात आहेत. एल निनोमुळे उदभवलेल्या कमी पाऊसाच्या परिस्थितीच्या उंभरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याना अनेक कारणांनी आर्थिक झळ बसत असली तरी हंगामाच्या पूर्वतयारीला मात्र वेग आला आहे.
पावसाचे आगमन दिलासादायक झाले असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पारंपारिक औजारे कारागिराकडून बनवून घेतात. मात्र महागाईमुळे औजाराना देखील दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारी नाही.तरी देखील ते खरेदी करीत आहे. ट्रॅकटरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहेत. तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावं खरीप हंगामासाठी निश्चित केली आहे.
-----------
खरीपाच्या उत्पादनात घट
तालुक्यातील महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. तालुक्यात अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची कामे रखडली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे सुरु करतात. मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेत मशागतीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चार ते पाच वर्षात खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.