पान-१-- फोटो वापरणे
-------------
यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा
नऊ वर्षानतर आला योग, गणेशभक्तांमध्ये उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरु
----------------------------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.३ : समस्त भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. मात्र इतर वेळेपेक्षा यावेळेचा गणेशोत्सव अधिक उत्साहाचा ठरणार आहे. योगायोगाने यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा आला आहे. साधारणपणे नऊ वर्षानंतर हा योग येतो. यापूर्वी २०१७ मध्ये गणेशोत्सव १२ दिवसांचा आला होता. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी जास्त दिवस मिळणार असल्याने मंडळाकडून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरु आहे.
--------------
यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी व २५ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. नेहमीपेक्षा गणेशोत्सवासाठी १० ऐवजी १२ दिवसांचा म्हणजे दोन दिवस जास्त मिळणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे येथील चेतन भोर यांनी सांगितले.
साधारण नऊ वर्षानंतर गणेशोत्सव हा बारा दिवसांचा येतो. प्रत्येक तीन वर्षानंतर मराठी महिन्यात एक महिना अधिक येतो. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. असे तीन अधिक महिने येऊन गेल्यावर येणारा भाद्रपद शुध्द चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत येणारा गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा येतो. कारण कोणत्यातरी दोन तिथींची वृद्धी (वाढ) होते अशी माहिती ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक मनीष कुलकर्णी यांनी दिली. यापूर्वी २०१७ मध्ये गणेशोत्सव १२ दिवसांचा आला होता, यानंतर २०३५ व २०४४ आणि २०५३ मध्ये अशा प्रकारे गणेशोत्सव १२ दिवसांचा येईल.
------------------------