फोटो : 08677
इगतपुरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र प्रदान देताना उपसंचालिका स्नेहल साळुंखे, ‘मविप्र’चे सभापती ॲड नितीन ठाकरे आदी.
इगतपुरीच्या शिक्षकांना
क्रीडा सेवा सन्मानपत्र
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. ६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन व उत्कृष्ट नियोजनाबद्दल तालुक्यातील पाच क्रीडाशिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नाशिक विभागाच्या उपसंचालिका स्नेहल साळुंखे, ‘मविप्र’चे सभापती ॲड. नितीन ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे, नरेंद्र छाजेड, संजय चव्हाण, अविनाश टिळे आदी उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यात शालेय स्तरावर क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला. यात महात्मा गांधी हायस्कूलचे विजय सोनवणे, न्यू इंग्लिश स्कूल, वाघेरे येथील दगडू तेलोरे, असिमा बाल शैक्षणिक केंद्र, आवळखेडचे रिझवान शेख, ज्ञानगंगा महाविद्यालय, माणिकखांबचे भाऊसाहेब आहेर, न्यू इंग्लिश स्कूल, आहुर्लीचे अशोक उशीरे यांचा समावेश आहे.
--------------------------