गिरणा नदीपात्रात
तरुणाचा बुडून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. १४ : महालपाटणे (ता. देवळा) येथे गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १४) दुपारी घडली. देवळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू आहे. गुरुवारी (ता.१४) दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्पेश रवींद्र भंडोरे (वय १९) हा मित्रांसोबत क्रिकेट खेळून झाल्यानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. तरुणाचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अथक प्रयत्नांनंतर कल्पेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे महालपाटणे व परिसरात शोककळा पसरली आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात कल्पेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे तपास करीत आहेत.
KHW26B08260
फोटो - कल्पेश भंडोरे