देवळा तालुक्यात मान्सूनचे आगमन, मोठ्या पावसाची प्रतीक्षा

देवळा तालुक्यात मान्सूनचे आगमन, मोठ्या पावसाची प्रतीक्षा
Published on
देवळा तालुक्यात हजेरी देवळा : दीर्घ प्रतीक्षेनंतर देवळा तालुक्यात सोमवारी (ता. २२) मान्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले. पावसाच्या सरी बरसताच शेतकरी आणि नागरिकांनी पावसात भिजत आनंद व्यक्त केला. मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान तालुक्यात अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. अर्धा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत होते. शेतीची मशागतीची कामेही ठप्प झाली होती. दरम्यान, पावसाअभावी भूजल पातळीत घट झाली असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. पहिल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या आशा उंचावल्या असून मशागतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र खरीप हंगाम सुरळीत होण्यासाठी आणि पेरण्यांना गती मिळण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची नजर अद्याप आभाळाकडेच लागून आहे. फोटो : देवळा येथे सुरू असलेला पाऊस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com