श्रीराम मंदीराचे
वाखारवाडीत भूमीपूजन
सकाळ वृत्तसेवा
देवळा ता.२५ : वाखारवाडी (ता.देवळा) येथे गावकऱ्यांच्या सहभागातून प्रभू श्रीराम नवीन मंदिराच्या भूमिपूजन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने पैसा उभा करत श्रमदानातून व एकजुटीने मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे.
आमदार डॉ. आहेर यांनी, गाव एकत्र आले की ग्रामविकासाला गती येते त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने योगदान देणे आवश्यक आहे. गावात आध्यत्मिक वातावरण, संस्कार, संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चित मदत होईल असे सांगितले.या मंदिराच्या भूमिपूजनाला देवदारेश्वरचे गणेशानंद पुरी महाराज, माजी जिप सदस्य प्रशांत देवरे, मविप्रचे माजी संचालक डॉ.व्ही.एम.निकम यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी वाघ मळा रस्त्याच्या कामाची पाहणी करून उद्घाटन करण्यात आले.
मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, वसाकाचे माजी संचालक बाळासाहेब बिरारी, तुषार गुंजाळ, सुनील आहेर, नगरसेवक अशोक आहेर, उपसरपंच जगदीश निकम, सोसायटीचे रविंद्र निकम, कडू वाघ, घनश्याम निकम, ललित निकम, हरीश निकम, विजय जाधव उपस्थित होते.मुन्ना सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ- वाखारवाडी ता.देवळा : येथील गावकर्यांच्या सक्रीय सहभागातून जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार डॉ.राहुल आहेर, गणेशानंद पुरीजी महाराज, प्रशांत देवरे, डॉ.व्ही.एम.निकम व इतर.