जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी वाचनालय

जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी वाचनालय
Published on
सकाळ विशेष -------------- मेन फिचर जुनी-नवी पुस्तक संकलितातून वाचनालय ग्रंथदानातून ज्ञानालयालयाचा नाकोडे विद्यालयाचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा कळवण ता.१४ ः ग्रंथदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नाकोडे येथील मविप्र समाजाच्या शाळांनी जुनी-नवी पुस्तके संकलित करून ग्रामस्थांसाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०० पुस्तके देण्यासाठी २० नागरिकांनी संपर्क साधला आहे. नाकोडे (ता.कळवण) येथील मविप्र समाजाचे आदर्श शिशु विहार, अभिनव बाल विकास मंदिर आणि जनता विद्यालय या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घरातील कपाटात पडून असलेली किंवा वाचून झाल्यानंतर अडगळीतील पुस्तके जमा करून त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, सामान्य ज्ञान, शब्दकोश, साहित्यविषयक पुस्तके तसेच विविध नियतकालिकांचा समावेश असणार आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, सामान्य ज्ञान, शब्दकोश, साहित्यविषयक पुस्तके तसेच विविध प्रकारचे वाचन साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. उपक्रमाचे फायदे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण होईल, विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्य वाचनामुळे शाळेत वाचन संस्कृती रुजेल. वाचनालयामुळे माजी विद्यार्थी व गरजू विद्यार्थी आणि ग्रामस्थ शाळेशी जोडले जातील. वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि वार्षिक अंक वाचण्याची संधी मिळेल. चौकट शिक्षक जाणार घरोघरी पुस्तक देणाऱ्या नागरिकांना विद्यालयात येण्याची गरज नाही. विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन पुस्तके सन्मानपूर्वक स्वीकारणार आहेत. हा पुस्तक संकलन उपक्रम १५ मे २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोट विद्यालयातर्फे अभिनव पुस्तक संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घरातील कोणतेही उपयुक्त पुस्तक आम्हाला द्यावे. आम्ही ते सन्मानपूर्वक घरी येऊन स्वीकारू, चला, ज्ञानाचा दिवा घरोघरी प्रज्वलित ठेवूया आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करूया. - - नितीन पाटील, (मुख्याध्यापक, अभिनव बाल विकास मंदिर, नाकोडे) . नाकोडे येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सुरू केलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. पुस्तके संकलित झाल्यानंतर सुसज्ज वाचनालय उभारण्यासाठी संस्था सहकार्य करेल. नागरिकांनी यात सहभागी व्हावे. - रवींद्र देवरे, संचालक, माविप्र समाज संस्था, नाशिक चौकट शर्ट- नितीन पाटील व्हाईट शर्ट- रवींद्र देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com