ॲंकर
देसराणे-पळाशा नाला रस्त्याला मिळणार नवी वाट
आमदार नितीन पवार यांच्या पुढाकारातून खडीकरणाचा शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. १ : देसराणे ते पळाशा नाला परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून, तसेच देसराणेचे सरपंच भगवान वाघ व उपसरपंच वर्षाताई रवींद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व खड्डे निर्माण होत असल्याने ट्रॅक्टरसह अन्य वाहनांची ये-जा आणि शेतमालाची वाहतूक करणे कठीण होत होते. त्यामुळे रस्त्याच्या खडीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून या कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतमालाची वाहतूक सुलभ होण्याबरोबरच विद्यार्थी, नागरिक व वाहनधारकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. परिसरातील गावांना जोडणारी वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे. रस्त्याचे खडीकरण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. सरपंच भगवान वाघ, उपसरपंच वर्षाताई हिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कुंदन हिरे आदी उपस्थित होते.
कोट
ग्रामस्थांच्या मागणीला आमदार नितीन पवार, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळातही गावातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.
- कुंदन हिरे (ग्रामपंचायत सदस्य, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
ग्रामस्थांच्या मागणीला आ नितीन पवार सरपंच व उपसरपंच व सदस्य यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम सुरु झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळातही गावातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न सुरु राहतील.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य कुंदन हिरे
देसराणे :- देसराणे- पळाशा नाला रस्ता कामाचा शुभारंभ करतांनाभगवान वाघ, उपसरपंच वर्षाताई हिरे आणि राष्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य कुंदन हिरे व मान्यवर