महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला पाऊस
कळवण, बागलाण तालुक्यात पावसाची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
कळवण ता. १२ ः गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना शनिवारी (ता. १२) झालेल्या पावसाने दिलासा दिला. दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळण्याची आशा आहे.
तालुक्यात सुरुवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला होता. मका, सोयाबीन, भात, नागली, वरईसह विविध पिकांना पाण्याची गरज होती. शनिवारी पावसाच्या सरी बरसताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
केरसाणेत पाऊस
नरकोळ ः बागलाणसह परीसरातील दसाने पिंगळवाडे मुंगसे आदि गावांमध्ये गेल्या २२ ते २३ दिवसांनंतर आज १२ शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली दुपारी १ वाजेपर्यंत हा अधूनमधून पाऊस सुरु असल्याने खरीप हंगामातील पिकांना या पावसामुळे चांगले जीवदान मिळाले मका बाजरी सोयाबीन या पिकांची पावसाभावी मोठ्या प्रमाणात कोमवली होती परंतु पावसाने आज साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निर्माण झाला. शेतकऱ्यांचा आवडता फळा सण ही कोरडा गेल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाबद्दल चिंता निर्माण झाली होती.