शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या
बॅडमिंटनपटूंची विभागीय पातळीवर निवड
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. १४ : जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने कळवण येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब बॅडमिंटन कोर्टवर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा झाली. नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उल्लेखनीय कामगिरी करत १२ खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.
१४ वर्षांखालील मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत अस्तित्व अनुप पवार याने द्वितीय, तर मुलींच्या स्पर्धेत कुमुद हिरे हिने उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत रिचर्ड मिसाव याने प्रथम, तर ऋतुराज डाकोरे याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या टीम इव्हेंटमध्ये प्रणवी पवार, हंसिनी जगदेव, सेजल कांबळे, गुंजन वळवी व हेतल गिरासे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
१९ वर्षांखालील मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत चिन्मय पाटील व धैर्यशील पवार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या स्पर्धेत गणेशा वळवी हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. या कामगिरीच्या आधारे एकूण १२ खेळाडूंची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना शाळेचे बॅडमिंटन प्रशिक्षक राकेशकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा बॅडमिंटनपटूंचा संघ अध्यक्ष डाॅ जे डी पवार प्राचार्य बी एन शिंदे