भोंदू हाडवैद्याकडून रुग्णांची फसवणूक? आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली हजारो रुपये घेतल्याचा आरोप; पोलिसांकडे तक्रार

भोंदू हाडवैद्याकडून रुग्णांची फसवणूक? आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली हजारो रुपये घेतल्याचा आरोप; पोलिसांकडे तक्रार
Published on
भोंदू हाडवैद्याकडून रुग्णांची फसवणूक आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली हजारो रुपये घेतल्याचा आरोप कळवण ता.१६ : मणक्याचे विकार, पॅरालिसिस, गुडघेदुखी, संधिवात तसेच संतती न होण्यासह विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करण्याचे आश्वासन देऊन रुग्णांकडून हजारो रुपये घेतल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील निकम नावाच्या कथित हाडवैद्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी कळवण पोलिसांत तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. संबंधित व्यक्ती विविध आजार बरे करण्याचा दावा करून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. उपचारासाठी मोठी रक्कम घेतल्यानंतरही आरोग्यात सुधारणा झाली नसल्याने आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पात्रता, उपचार करण्याचा अधिकृत परवाना, उपचारपद्धती आणि रुग्णांकडून घेतलेल्या रकमांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांनी नोंदणीकृत व पात्र वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आजार बरा करण्याच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची पात्रता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ......... कोट... पत्नीला काही दिवसांपासून मणक्याचा विकार आहे. संबंधित व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपचार घेतले. त्याने उपचारांच्या नावाखाली माझ्याकडून २१ हजार रुपये घेतले; मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. भाऊसाहेब आहिरे, श्रीरामनगर, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com