शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नेमबाजीत ''सुवर्ण'' वेध

शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा  नेमबाजीत ''सुवर्ण'' वेध
Published on
पान दोन ॲंकर -------- 09540 कळवण : यशस्वी खेळाडूंसह शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापाक अध्यक्ष डाॅ जे डी पवार व पदाधिकारी. शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश शूटिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक; प्री-नॅशनल स्पर्धेसाठी निवड सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. १७ : महाराष्ट्र रायफल असोसिएशन (मुंबई) यांच्यातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र एअर अँड फायर आर्म्स स्पर्धा-१’ मध्ये कळवण येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत एअर पिस्तूल आणि पीप साईट या प्रकारांत यश संपादन केले आहे. शाळेतील कुंदन पांडुरंग सोमवंशी, स्वरांजली राकेश खैरनार, वैदेही लवेश खैरनार, अर्णव छोटू पवार, स्वयम सुनील मोरे व संस्कार भिमराव जाधव या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी कुंदन सोमवंशी (एअर पिस्तूल) तसेच वैदेही खैरनार, अर्णव पवार व संस्कार जाधव (पीप साईट) यांचा समावेश आहे. स्वरांजली खैरनार, ओम जगताप, स्वयम मोरे व तनुष्का शिंदे यांनी मिळवलेल्या यशाच्या बळावर त्यांची ''महाराष्ट्र एअर अँड फायर आर्म्स स्पर्धा-२'' च्या पुढील फेझसाठी निवड झाली आहे. मोहाली (पंजाब) येथे झालेल्या प्री-नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पीप साईट प्रकारात अनुष्का तुषार शिंदे हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला; तर स्वयम मोरे (पीप साईट) व ओम जगताप (एअर पिस्तूल) यांनीही यश संपादन केले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गोवा येथे पार पडलेल्या १३ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये (रायफल इव्हेंट) वैदेही खैरनार, अर्णव पवार व संस्कार जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्यांची मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या आगामी ''प्री-नॅशनल चॅम्पियनशिप''साठी निवड झाली आहे. गुजरात येथे झालेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये (पिस्तूल प्रकार) कुंदन पांडुरंग सोमवंशी याने बाजी मारल्याने त्याची उत्तराखंड येथे होणाऱ्या प्री-नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक देविदास सुडके यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, अध्यक्ष शैलेश पवार, कार्यकारी संचालक व प्राचार्य बी. एन. शिंदे, प्राचार्य जे. एल. पटेल, डॉ. अविनाश लांडगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com