रोहित पवार युपीएससीत ६९ वा

रोहित पवार युपीएससीत ६९ वा
Published on
KPD26B12574 निमगूळ : रोहित पवार यांचा सत्कार करताना मनोहर भदाणे. ------------- निमगूळच्या रोहितचा ग्रामस्थांकडून सत्कार निमगूळ (ता. धुळे) : येथील रोहित संजय पवार या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘भारतीय वन सेवा’ परीक्षेत देशात एकोणसत्तरवा क्रमांक पटकावला. रोहितच्या या यशामुळे धुळे जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर उंचावला आहे. त्याबद्दल पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आशुतोष पाटील, विद्याधर पाटील, दिलीप सूर्यवंशी, जितेंद्र मोरे, शांताराम सूर्यवंशी, दिनेश मोरे, पिंटू चव्हाण, अजित मोरे उपस्थित होते. या वेळी माजी अध्यक्ष भदाणे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर रोहित पवार यांनी हे दैदीप्यमान यश मिळविले आहे. शेतकरी कुटुंबातील रोहितचे हे यश धुळे ग्रामीण भागातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com