कापडणे शेतीकामे रखडलीत

कापडणे शेतीकामे रखडलीत
Published on
उन्हाच्या तडाख्याने शेतीची कामे रखडली कापडणे, ता. १४ : धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वर जात आहे. मंगळवारी (ता. १३) कमाल तापमान ४४.८ अंशावर पोहोचले. गेल्या आठवडाभरापासून तापमान ४४ अंशांच्या पुढेच राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. अनेक भागांत भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, बाजरी, भाजीपाला व इतर बागायती पिकांना पाण्याची मागणी वाढली आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com