धनूर विधवामातांचा सन्मान

धनूर विधवामातांचा सन्मान
Published on
KPD26B12822 धनूर : एकला मातांचा सन्मान करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी. ------------ एकाकी आयुष्याला मिळाला सन्मानाचा आधार धनुर- लोणकुट्यात तीस एकल मातांचा कृतज्ञतापूर्वक गौरव सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २६ : धनूर- लोणकुटे (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीने जागतिक एकल माता दिनाचे औचित्य साधून समाजात एकाकी जीवन जगणाऱ्या ३० महिलांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. एकल महिलांच्या त्यागाचा आणि संघर्षाचा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच चेतन शिंदे अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी, माजी उपसरपंच विजय चौधरी, सुरेश शिंदे, अमृत चौधरी, पृथ्वीराज गुजर, प्रवीण चौधरी, पोलिस पाटील संदेश शिंदे, राजेंद्र वाघ, सचिन जाधव, लोकेश वाघ, रावसाहेब कोळी आदी उपस्थित होते. सरपंच शिंदे म्हणाले, पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे पेलणाऱ्या या मातांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमात भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’पदी निवड झालेल्या गावातील विशाल चौधरींचा कुटुंबियांसह विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com