KPD26B13264
खंडलाय : सेवा सप्ताहात अध्यात्मिक विचार मांडताना रविकिरण महाराज.
-----
जनसेवेसह ईश्वर भक्तीतच
समाधान : रविकिरण महाराज
खंडलाय येथे कीर्तनातून समाजप्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३१ : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस प्रगतीसाठी धावत आहे. खरे समाधान जनसेवा आणि ईश्वर भक्तीतच आहे. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यातच रमले पाहिजे, असे अध्यात्मिक विचार खानदेशचे समाजप्रबोधनकार कीर्तनकार रविकिरण महाराज यांनी व्यक्त केले.
खंडलाय (ता. धुळे) येथे आमदार राम भदाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘माझा नेता- माझा अभिमान’ सेवा सप्ताह अभियानांतर्गत आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. कीर्तनात त्यांनी विनोदी शैलीत समाजातील व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर आणि कौटुंबिक कलह यावर प्रबोधन केले. हास्य आणि भक्तीचा संगम साधत त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. या भक्तिमय कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जवान दिलीप अहिरे, पांडुरंग देवरे, प्रवीण बागूल आदी उपस्थित होते. रविकिरण महाराज म्हणाले, प्रत्येकाने अध्यात्म सेवेत रमले पाहिजे. देवच आपल्याला तारून नेतो. रावसाहेब माळी, प्रताप हालोर, प्रवीण अहिरे, प्रदीप हालोर, जगदीश देवरे, सोमेश्वर खलाणे, मोहन निकम, नवल पाटील, भाऊसाहेब माळी, सुरेश पाटील, अमरदीप देशमुख यांच्यासह संत सावता भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ आणि वंदे मातरम् रिक्षा स्टाफ यांनी संयोजन केले.