KPD26B13269
धुळे : विधेयकातील जाचक अटींचा निषेध करतांना पीटीएचे संचालक व सभासद.
---------
धुळे जिल्ह्यात खासगी क्लाससचे निषेध आंदोलन
क्लास बंद : राज्य सरकारच्या क्लासेस विधेयकातील जाचक अटींना विरोध
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३१ : राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेससंदर्भात स्वतंत्र नियमन कायदा आणला आहे. १३ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंगला प्रवेश बंदी असणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. या विधेयकातील जाचक अटींना विरोध करण्यासाठी व आमुलाग्र बदल करण्यासाठी धुळे जिल्हा प्रायव्हेट टीचर असोसिएशनने (पीटीए) विरोध करण्यासाठी सोमवारी (ता. ३१) धुळे जिल्ह्यासह राज्यातील क्लास संचालकांनी क्लास बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
निषेध व्यक्त करण्यासाठी पीटीएचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, पदाधिकारी उमेश भांडारकर, ज्येष्ठ संचालक चिंधू लोहार, नरेंद्र महाले, प्रमोद गणेश थोरात, उमेश भांडारकर, मंगेश डी. वैद्य, चंद्रकांत एस. शिंपी, भूषण खैरनार, दिपश्री पाचपुते, मैत्रेयी पाटील, स्वाती पाटील, रोशन जाधव, पराग बोरसे, सुनील बोरसे, कपिल बोरसे, बनवारीलाल शर्मा, दीपक सोनवणे, जगन्नाथ वाघ आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ संचालक भांडारकर म्हणाले, या विधेयकातील जाचक अटींना विरोध करण्यासाठी खासगी शिक्षक संघटनेने (पीटीए) दमदार पावले उचलली आहेत. लोकजागृतीसह लोकचळवळ सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. विधेयकावर आक्षेप नोंदवणे, प्रत्येक मतदारसंघातील आमदारांना भेटून सत्य परिस्थिती मांडणे, प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन आणि दोन दिवस क्लास बंद ठेवणे आदींचा या आराखड्यात उल्लेख आहे.
संचालक चिंधू लोहार म्हणाले, या कायद्याने राज्यात लाखो बेरोजगार होतील आणि प्राथमिकचे क्लास घेणारे युवक बेरोजगार होतील. १३ वर्षांखालील क्लासेस बंद झाल्यास स्कॉलरशिप, नवोदय, होमी भाभा सारख्या स्पर्धा परीक्षांचे काय आदी प्रश्न निर्माण होणार आहेत. जिल्हाध्यक्ष डाॅ. संजय कदम, गिरीश साळुंके, विजय जाधव, अभिजीत सनेर आदींच्या मार्गदर्शनाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.