(पान ४ ला ॲंकर)
---------------
लोगो : KPD26B13287
-----------
कापडणे गटात तीन हजार मतदारांची घट
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
सकाळ वृृत्तसेवा
कापडणे, ता. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या एसआयआर (विशेष सखोल पुनरिक्षण) यादीने कापडणे गटातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कापडणे गटात तब्बल तीन हजार ३१५ मतदार कमी झाले असून, एकट्या कापडणे गावातच दोन हजारांहून अधिक मतदार पत्ता लागलेला नाही.
प्रशासनाने केलेल्या पडताळणीत दुबार नावे, स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण मतदार संख्येत १४.६० टक्क्यांची घट झाली आहे. कापडणे गटात एकूण २२ हजार ६९९ मतदार होते. पडताळणीनंतर तीन हजार ३१५ मतदार अपात्र ठरले आहेत. यात सर्वाधिक फटका कापडणे गावाला बसला आहे. येथे ११ हजार ४५१ पैकी दोन हजार ०३४ मतदार म्हणजेच १७.७६ टक्के मतदार कमी झाले आहेत. कौठळ येथे एक हजार ५८३ पैकी २८२ (१७.८१ टक्के), न्याहळोद येथे सहा हजार २९४ पैकी ७२७ (११.५५ टक्के), धनूर- लोणकुटे येथे दोन हजार ०८७ पैकी १७७ (८.१७ टक्के), हेंकळवाडी येथे ७०० पैकी ६२ (८.८५ टक्के) आणि तामसवाडी येथे ५८४ पैकी ३३ (५.६५ टक्के) मतदार कमी झाले आहेत.
--------
कापडणेतील समीकरणे
कापडणेत दोन हजारांहून अधिक मतदार कमी झाल्याने निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. कमी झालेल्या मतदारांचा फटका कोणत्या गटाला बसणार आणि फायदा कोणाला होणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या घटलेलेल्या मतदारसंख्येचा परिणाम निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा टक्का साठ ते सत्तरच्या दरम्यान राहायचा. आता हा टक्का वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
--------
कापडणे गटातील गावे व एसआयआर नोंदी
गाव---------एकूण मतदार-------नाकारलेले मतदार---टक्के
कापडणे------११,४५१----------२०३४------------१७.७६
न्याहळोद-----६२९४-------------७२७------------११.५५
धनूर-लोणकुटे--२०८७------------१७७-------------८.१७
कौठळ--------१५८३------------२८२------------१७.८१
तामसवाडी-----५८४-------------३३--------------५.६५
हेंकळवाडी-----७००-------------६२--------------८.८५
एकूण---------२२,६९९---------३३१५------------१४.६०