KPD26B13289
खंडलाय : रोहीत्र जळाल्यानंतर चोवीस तासांच्या आत नव्याने बसविले जात आहे.
-------
वीस महिन्यात १५५ रोहित्रांची व्यवस्था
आमदार राम भदाणे : धुळे तालुक्यात विजेची समस्या निघतेय निकाली
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३ : धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची वीजेची समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी पूर्णतः प्रयत्न सुरू आहेत. केवळ वीस महिन्यांच्या कार्यकाळात १५५ पेक्षा अधिक रोहित्र बसवून शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील काळात शंभर टक्के विजेची समस्या निकाली निघालेली असेल, असे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.
खंडलाय (ता. धुळे) येथे चोवीस तासात जळालेले रोहित्र नव्याने बसविण्यात आले. त्यासंदर्भात आमदार भदाणे बोलत होते. त्यांनी तालुक्यात बसविण्यात आलेल्या रोहित्रांची माहिती दिली. नव्वद गावांमध्ये जळालेले रोहित्र नव्याने बसविले आहेत. यामध्ये देऊर, नंदाळे, विश्वनाथ, शिरडाणे प्र.नेर, सुकवड, मोघन, चिंचखेडे, बोरीस, लोणखेडी, चिंचवड, न्याहळोद, जुनवणे, देवभाने, कापडणे, सोनेवाडी, पुरमेपाडा, अनकवाडी, रामी, वणी खुर्द, मेहरगाव, अजनाळे, विसरणे, वार, निमडाळे, अजंग तांडा, कुंडाणे, सायने, लामकानी, कौठळ, आर्वी, काळखेडे, वडणे, खंडलाय, चिंचवार, नावरा- नावरी, विंचूर, उडाणे, निमगूळ, आंबोळे, धनुर, नरव्हाड, अंबोडे, सिताणे या गावांचा समावेश आहे.
गाव व शिवारांमध्ये ६३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर अधिकचा दाब असल्याने वारंवार रोहित्र जळत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार भदाणे यांनी २५ हून अधिक ठिकाणी ६३ केव्हीचे रोहित्र काढून १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसवले आहे. लामकानी, धनूर, विश्वनाथ, नरव्हाळ, न्याहळोद, सुकवड, दह्याने, देवभाने, वडणे, नेर गावठाण, नेर, कासवीर, मुकटी, मोघण, बांबुर्ले, सुट्रेपाडा, आर्वी, बेंद्रेपाडा, निमगूळ, कुंडाणे-वार, चौगाव, कुसुंबा, शिरूड आदी ठिकाणी क्षमतावाढ करण्यात आली आहे.
चाळीसपेक्षा अधिक ठिकाणी नवे रोहित्र बसविण्यात आले आहेत. यात कावठी, न्याहळोद, कापडणे- न्याहळोद, चिंचखेडे, निमगूळ, नूरनगर, महालकाळी, लामकानी, नगाव बुद्रुक, नावरा, हेंकळवाडी, वडणे, सायने, चौगाव, सोनेवाडी, शिरूड, कुसुंबा, देऊर बुद्रुक, मोघण, जुनवणे, आनंदखेडा, सुट्रेपाडा, अजंग, मुकटी, आमदड, खंडलाय, तरवाडे, बेंद्रेपाडा, अकलाड, आंबोडे, शिरडाणे, बांबुर्ले या गावांचा समावेश आहे.