धुळे तालुक्यात ‘एक गाव अनेक गणपती’

धुळे तालुक्यात ‘एक गाव अनेक गणपती’
Published on
KPD26B13359 कापडणे : कुलस्वामिनी जोगाईमाता मंदिरातील पंचधातूची गणेशमूर्ती. --- धुळे तालुक्यात ‘एक गाव, अनेक गणपती’ तरुण मंडळांमध्ये वर्चस्ववाद आणि राजकीय स्पर्धा सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. १७ : शासनाच्या ‘एक गाव- एक गणपती’ या संकल्पनेला धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात हरताळ फासला आहे. गावात एकोप्याने एकच सार्वजनिक गणपती बसवावा, असा शासनाचा उद्देश असला, तरी प्रत्येक गावातील चौकांसह गल्ली-बोळात आणि मंडळा-मंडळात मिळून अधिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ‘एक गाव, अनेक गणपती’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गावातील तरुण मंडळांमध्ये वर्चस्ववाद आणि राजकीय स्पर्धेतून प्रत्येक गल्लीत स्वतंत्र गणपती बसविण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे वर्गणी गोळा करण्यावरून वाद, मिरवणुकीवेळी डीजे आणि ध्वनिक्षेपकाचा गोंगाट, तसेच रस्ते अडविण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘एक गाव- एक गणपती’ झाल्यास गावातील एकता टिकून राहते, खर्च वाचतो आणि तोच निधी गावविकासासाठी वापरता येतो. प्रत्येक गावातील मंडळांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने संकल्पना केवळ कागदावरच राहिली आहे. प्रशासनाने आवाहन करूनही कोणीही माघार घ्यायला तयार नाही. परिणामी, भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, खऱ्या भक्तीपेक्षा देखावा आणि स्पर्धेलाच जास्त महत्त्व आले आहे. दरम्यान, गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पुढील वर्षी ‘एक गाव- एक गणपती’ हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ------ पंचधातूची मूर्ती येथील कुलस्वामिनी जोगाईमाता मंदिरात पंचधातूची गणेशमूर्ती बसविली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य उजनबाई पाटील यांनी स्वखर्चाने ही मूर्ती बसविली आहे. पंचधातूची मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com