KSE26B01779
पेरेजपूर : विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सन्मान करताना न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे शिक्षक व पालक.
--------
गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सन्मान
पेरेजपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कासारे, ता. १४ : साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील श्री शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील असून, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले. यंदाच्या निकालात प्राची देवरे व प्रणाली शेवाळे यांनी प्रत्येकी ९१.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ऋतिका ठाकरे हिने ८८.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर सलोनी खैरनार हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच, वैष्णवी शेवाळे (८२.६० टक्के), सप्तश्री गायकवाड (८१.८० टक्के), आयुष सोनवणे (८१.२० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. दक्षता गायकवाड व मेघा सोनवणे यांच्यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक तानाजीराव शेवाळे, पंडितराव शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक व्ही. डी. देसले, श्रीमती एस. एस. देवरे, गौरव सोनवणे, पंकज बोरसे, विकास बोरसे, संजय देसले व चंद्रकांत बोरसे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, सचिव ॲड. एस. जे. भामरे, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती प्रमिलाबाई देसले, संचालक डॉ. पी. डी. देवरे, डॉ. अमित पाटील, शशीभूषण देसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.