KSM26B01687
कुसुंबा : श्रीहरी प्रतिष्ठाणतर्फे उष्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते स्विकारतांना नंदकिशोर शिरूडे व उपस्थित मान्यवर.
---------
शिक्षकी पेशा समाज घडविण्याचे पवित्र व्रत
डॉ. दिघावकर : श्रीहरी प्रतिष्ठाणतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुसुंबा (ता. धुळे), ता. १९ : शिक्षकी पेशा केवळ नोकरी नसून समाज माध्यम घडविण्याचे एक पवित्र व्रत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मुल्य आणि संस्कार रुजवून त्यांना सक्षम नागरिक बनविणारे शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी केले.
नामपूर (ता. बागलाण) येथील श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंचवीस वर्षापासून शिक्षक दिनाचा कार्यक्रम राबवला जातो. या माध्यमातून समाजातील आदर्श शिक्षकांचा समाजसेवींचा गौरव करण्यात येतो. यावर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम करणाऱ्या गुरुजनांना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुसुंबा एज्युकेशन संस्थेचे एम. के. शिंदे विद्यालयातील उपमुख्याध्यापक नंदकिशोर रघुनाथ शिरुडे यांना देखील सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद हरी नेरकर यांच्या कार्याचे महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते कुसुंबा एज्युकेशन संस्थेच्या सचिव सुनीता शिंदे, प्राचार्य आर. बी. बडगुजर, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांनी कौतुक केले.