होरायझन ऄकॅडमी दिंडोरी विद्यालयाची 100% निकालाची परंपरा

होरायझन ऄकॅडमी दिंडोरी विद्यालयाची 100% निकालाची परंपरा
Published on
LKH२६B०४६६७ ः स्नेहा महाले -------------------- होरायझनची स्नेहा महाले दिंडोरी तालुक्यात प्रथम ---------------- सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकाल ------------ सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता.१४ ः दिंडोरी येथील होरायझन ॲकॅडमीची शंभर टक्के निकालाची परंपरा सलग चौथ्यांदा कायम राहिली आहे. विद्यालयाची स्नेहा विकास महाले ९७.२० टक्के मिळवीत तालुक्यात प्रथम आली आहे. तिच्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ------------- अरिझा शफीक नायक हिने ९२.२० टक्के गुणांसह द्वितीय, वेदांत गोकूळ गायकवाड याने ९२ टक्के गुणांसह तृतीय, आदिती रवींद्र जाधव हिने ९१.६० टक्के गुणांसह चतुर्थ तर समीक्षा विनोद आपसुंदे हिने ९१.४० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे. विद्यालयातून एकूण २४ विद्यार्थी होते. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, ९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. उर्वरित ९ विद्यार्थ्यांनी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळविले. गुणवंतांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, तालुका संचालक प्रवीण जाधव यांनी तसेच प्राचार्या निर्मला जाधव यांनी अभिनंदन केले. ----------------
Marathi News Esakal
www.esakal.com