पान-३ कॉमन
------------
२०-१
महिला हक्क समितीची
दिंडोरी तालुक्यात भेट
लखमापूर, ता.१४ : विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने अध्यक्षा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पंचायत समिती तसेच दिंडोरी पोलिस ठाण्यास भेट देत महिला सुरक्षा, बालकल्याण योजना, अंगणवाडी सेवा आणि महिला अत्याचारासंदर्भातील विषयांचा आढावा घेतला. या दौऱ्यात आमदार मनीषा कायंदे, आमदार सीमा हिरे, आमदार मंजुळा गावित, आमदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समितीच्या दौऱ्यात महिला सुरक्षेसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली.
तळेगाव दिंडोरी येथील अंगणवाडीला भेट देत समस्या जाणून घेतल्या. पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी पदाधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधत समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दिंडोरी येथे क्रीडा संकुल व्हावे, ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन ऑपरेटरची रिक्त जागा तात्काळ भरावी, ग्रामीण भागांतील वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता सायरन कॅमेरे बसवावे, महिला सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना राबविणे आदींसह विविध मागण्या मांडल्या, समितीने दिंडोरी पोलिस ठाण्यात भेट देऊन महिला, विद्यार्थी व बालकांबाबत गुन्ह्याची माहिती घेऊन ठोस कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी समितीला जुन्या गुन्ह्याची माहिती दिली.
----------------