शेतकर्‍यांना निकृष्ट भुईमृग बियाणे वाटप मनसेचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

शेतकर्‍यांना निकृष्ट भुईमृग बियाणे वाटप मनसेचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी
Published on
पान-१ ---------- LKH26B04729 दिंडोरी ः निकृष्ट बियाण्यांबाबत निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष नामदेव गावित, बंडू भुसारे, प्रभाकर खराटे, मुरलीधर कनोजे, संतोष भोई, मालुसरे शिंगाडे, उत्तम चौरे आदी --------------- ३६-४ शेतकऱ्यांना निकृष्ट भुईमूग बियाणे वाटप ---------- मनसेचा दिंडोरीत हल्लाबोल ः गटविकास अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी ------------- सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता.२२: दिंडोरी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत तालुक्यात वितरित करण्यात आलेले भुईमुगाचे बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिंडोरीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिंडोरी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून दरवर्षी शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत अनुदानावर बियाणे वितरित केले जाते. यंदा वितरित करण्यात आलेले भुईमुगाचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बियाणे निकृष्ट असल्यामुळे पेरणी वाया जाण्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बियाण्याची खरेदी करणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे ही संपूर्ण जबाबदारी असलेल्या दक्षता अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बियाण्यांची योग्य तपासणी न करताच ते निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यास हे अधिकारी कारणीभूत ठरल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष नामदेव गावित, बंडू भुसारे, प्रभाकर खराटे, मुरलीधर कनोजे, संतोष भोई, मालुसरे शिंगाडे, उत्तम चौरे आदी उपस्थित होते. १६-१ कारवाई न झाल्यास आंदोलन शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आणि वेळ वाया घालवणाऱ्या या कारभाराचा मनसेने तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने यावर त्वरित पावले उचलून दोषींवर कारवाई न केल्यास आणि शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला आहे. १६-१ या आहेत प्रमुख मागण्या या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषींवर कडक शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. ------------ कोट निकृष्ट प्रतीचे बियाण्याबाबत वरिष्ठ पातळीवर माहिती पोहोचविण्यात आली आहे, त्याबाबत उद्या समिती येऊन तपास करणार आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध राहिल. - भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, दिंडोरी. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com