इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी सत्र 2025-26 मध्ये पहिली आणि शेवटची सुवर्णसंधी

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी सत्र 2025-26 मध्ये पहिली आणि शेवटची सुवर्णसंधी
Published on
नवोदय विद्यालयात अकरावी विज्ञानसाठी प्रवेशाची संधी लखमापूर, ता. २५ : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव (जि. नाशिक) येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे. दहावीत सीबीएसई किंवा महाराष्ट्र राज्य मंडळातून विज्ञान व गणित विषयात किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण तसेच १ जून २००८ ते ३१ जुलै २०१० दरम्यान जन्म झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्रता आहे. विद्यालयात निवासी व भोजन सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, क्रीडा, कला व कौशल्याधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.navodaya.gov.in तसेच ए. डी. शिंदे (९४०४८६३१६५) किंवा आर. के. पराडे (९८५०८७९७१०) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com