सुविधा देणे हेच खरे समाजकारण : झिरवाळ

सुविधा देणे हेच 
खरे समाजकारण : झिरवाळ
Published on
सुविधा देणे हेच खरे समाजकारण : झिरवाळ लखमापूर, ता. २३ : समाजात जेवढे महत्त्व धार्मिक मंदिरांना आहे, तितकेच अनन्यसाधारण महत्त्व ज्ञानमंदिरांना म्हणजेच शाळांना आहे. शाळांमध्ये आधुनिक सुविधा मिळवून देणे हेच खरे पवित्र समाजकारण आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांनी केले. करंजवण येथील मविप्र संचलित, जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नातून व गोकुळ झिरवाळ यांच्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या भोजन कक्षाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब मेधने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संचालक प्रवीण जाधव उपस्थित होते. या भोजन कक्षामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जेवताना होणारी गैरसोय दूर होईल, असे जाधव यांनी सांगितले. या सोहळ्याला विलास ढाकणे, मुक्तीराम चव्हाण, रवींद्र मोरे, पंढरीनाथ बर्डे, भगवान कोंड, मुख्याध्यापक वाय.यू. बैरागी, पर्यवेक्षक बी.के. उफाडे आदी उपस्थित होते. वीरकर के. एम. यांनी सूत्रसंचालन केले, तर रवींद्र मोरे यांनी आभार मानले. --
Marathi News Esakal
www.esakal.com