लोगो- सकाळ इम्पॅक्ट
फोटो : 05029
दिंडोरी ः सुरू असलेली सिग्नल यंत्रणा.
दिंडोरीत अखेर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
वाहतूक कोंडी सुटली; वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. १२ : काही महिन्यांपासून दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज (पालखेड चौफुली) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी तसेच ‘सकाळ’नेही याबाबत वृत्त प्रसारित केले होते. त्या अनुषंगाने खासदार भास्कर भगरे यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे येथे अखेर सिग्नल यंत्रण उभारण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, वाहनधारकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
गेल्या वर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते दिंडोरी येथील सिग्नल यंत्रणेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सिग्नलचे खांबही उभारण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सिग्नल यंत्रणा सुरू होण्यास विलंब झाला होता.
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे परिवहन विभागानेही असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव पुन्हा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आला. नगरपंचायतीच्या पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर सिग्नल यंत्रणा सुरू झाली. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला असून, वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याची गरज
सिग्नल यंत्रणा सुरू झाली असली, तरी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग केलेले नाही. त्यामुळे वाहनधारक पुढे पुढे सरकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर चारी बाजूंनी त्वरित पट्टे मारावेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी मागणीही नागरिकांनी केली. .......................................
चौकट
वाहतूक कोंडीतून सुटका
छत्रपती शिवाजी महाराज चौकात (पालखेड चौफुली) नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त होते. आता हा सिग्नल सुरू झाल्यामुळे चौकातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि वाहतूक कोंडीतून पूर्णपणे सुटका होईल, अशी अपेक्षा दिंडोरीकरांकडून व्यक्त होत आहे.,
.........