पान दोन
-------
05033
लखमापूर : रुंदीकरणासाठी तोडण्यात आलेली झाडे.
जानोरी, आंबे, ढकांबे दरम्यान वृक्षतोड
स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. १५ : जानोरी व आंबे ढकांबे या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या महामार्गासाठी अनेक स्थानिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. रूंदीकरणासाठी रस्ता कामात येणाऱ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याने यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी परसली आहे. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता ठेकेदार, प्रशासनाकडून उडावाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जानोरी व आंबे ढकांबे या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जमीन देखील अधिग्रहण करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. यासाठी कामाला अडथळा ठरणारी वृक्ष तोडण्यात आली आहे. यावर आता स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
तोडलेली झाडे ही वन विभागाला न देता झाडे मालकांच्या स्वाधीन करावी, तोडलेल्या झाडांचा योग्य पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, एका झाडाच्या बदल्यात एक नवीन झाड लावण्याचे व त्याचे संगोपन करण्याचे आश्वासन प्रशासनाने द्यावे, तोडलेल्या झाडांबाबत शासनाने शेतकऱ्यांना मोबदला प्रदान करावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास काम रोखून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.