पान-२ मेन
LKH26B05050
दिंडोरी ः ‘मविप्र’तर्फे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पत्र देण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्राध्यापकवर्ग.
-----------------
दिंडोरीत साडेतीनशे जणांना नोकरी
रोजगार मेळाव्यात सत्तरहून अधिक कंपन्या सहभागी; १,०३० युवकांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.१७ : ‘मविप्र’ समाजाच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर व भारतीय उद्योग परिसंघ तसेच मविप्रचे येथील महाविद्यालयातर्फे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल साडेतीनशे पात्र विद्यार्थ्यांना जागेवरच नोकरीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यात सत्तरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या तसेच हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
----------------
प्रांत अधिकारी कार्यालयाशेजारी जनता उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच हा मेळावा झाला. या मेळाव्यात सत्तरहून अधिक कंपन्यांनी सहाशेहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. तब्बल एक हजार तीस युवक- युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली. त्यापैकी ३५० युवकांना कंपन्यांकडून ऑफर लेटर देण्यात आले. दहावी, बारावी तसेच आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने दिंडोरी तालुक्यातील युवकांना मोठा लाभ झाला.
सरचिटणीस ॲड. ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळणे ही केवळ विद्यार्थ्याची गरज नसून संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशी जोडलेली बाब असल्याचे सांगितले. कौशल्य, मेहनत, प्रामाणिकपणा व सातत्याच्या जोरावर युवकांनी करिअरमध्ये यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करावी. युवकांनी उपलब्ध संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
--------------
१६-२ चौकट
स्थानिक संधी मिळाव्यात ः जाधव
स्थानिक संचालक जाधव यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील युवक- युवतींना रोजगारासाठी नाशिक, पुणे व इतर शहरांकडे जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिंडोरीतच नामांकित कंपन्या आणून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कौशल्यविकास, संवादकौशल्य व तांत्रिक ज्ञान आत्मसात करावे असेही ते म्हणाले.
---------------------
१,०३० युवकांची नोंदणी आणि ३५० जणांना थेट ऑफर लेटर मिळाल्याने दिंडोरीतील हा रोजगार मेळावा युवकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. भविष्यातही अशा रोजगाराभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित युवकांनी व्यक्त केली. मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मणराव लांडगे, स्थानिक संचालक प्रवीण जाधव, श्रीमती शालनताई सोनवणे, सीआयआयचे सागर शिरसाठ, शालेय व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब मुरकुटे, केबीटी कॉलेजचे प्राचार्य पाटील व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ, जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, डीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे, होरायझनच्या प्राचार्या निर्मला जाधव तसेच तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष कथार व प्रतीक्षा गरुड यांनी सूत्रसंचालन केले. सायली होळकर यांनी आभार मानले.