पान-२ ॲंकर
---------------
दिंडोरीत साठ ग्रामपंचायतींवर अवघे दहा प्रशासक
विस्तार अधिकाऱ्यांकडे सुत्रे ः कागदोपत्री सोय, मात्र गैरसोयच होण्याची शक्यता अधिक
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.१७ : दिंडोरी तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ६० ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने गावातील कामे खोळंबू नये म्हणून विस्तार अधिकाऱ्यांकडे ही सूत्रे सोपवण्यात आली आहेत. यातच तब्बल साठ गावांना अवघे दहा प्रशासक असल्याने ते कितपत लक्ष देणार हाही प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
---------------
गावांची संख्या मोठी आणि उपलब्ध अधिकारी संख्या मर्यादित असल्याने बहुतांश विस्तार अधिकाऱ्यांवर एकाच वेळी अनेक गावांचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. यात एका अधिकाऱ्याकडे कमाल १४ गावांपर्यंतची जबाबदारी देण्यात आली आहे.
१६-१
अधिकाऱ्यांवर वाढता ताण
तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचा गाडा हाकण्यासाठी केवळ १० विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडणार असून पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि दाखले वाटप यांसारख्या दैनंदिन कामांवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन नवीन मंडळ अस्तित्वात येईपर्यंत ही प्रशासकीय यंत्रणाच कारभार सांभाळणार आहे.
------------
२०-२ चौकट
प्रशासक व त्यांच्याकडील गावे
१) हेमंत नथ्थू कापसे (१४ गावे) : खेडगाव, गोळशी, चिंचखेड, चाचडगाव, जऊळके वणी, जोपूळ, तिसगाव, फोफळवाडे, बोपेगाव, मातुरेवाडी, वणीखुर्द, विळवंडी, शिंदवड, सोनजांब.
२) संजीवनी किसनराव चौधरी (११ गावे): कादवाम्हाळुंगी, कोशिंबे, खडकसुकेणे, चौसाळे, परमोरी, मावडी, माळेदुमाला, म्हेळुस्के, लखमापूर, वलखेड, हस्तेदुमाला.
३) बापू शंकर सादवे ( ११ गावे) : अहिवंतवाडी, इंदोरे, कुर्णोली, कोकणगाव बु., गांडोळे, तिल्लोळी, देवसाने, पाडे, पिंपळगाव केतकी, वाघाड, हातनारे.
४) प्रवीण हिरामण बहिरम (५ गावे) : गोंडेगाव, तळेगाव वणी, नाळेगाव, पांडाणे, पिंपळगाव धूम.
५) सुनील मुरलीधर हिरे (५ गावे) : करंजखेड, दहिंवी, पिंप्रीआंचला, लोखंडेवाडी, वनारे.
६) परशराम पांडुरंग महाले (३ गावे) : अवनखेड, जोरण, पुणेगाव.
७) अभिमन महारु बहिरम (३ गावे) : कोल्हेर, चंडीकापूर, भनवड.
८) स्वाती गोरक्षनाथ भिसे (३ गावे) : ओझे, करंजाळी, वारे.
९) वंदना दत्तात्रेय चव्हाण (३ गावे) : आंबाड, बागडीचापाडा, महाजे.
१०) कैलास पुंजाराम पगार (२ गावे) : आंबेदिंडोरी, पालखेड बं.
---------------