प्रसूती दरम्यान
महिलेचा मृत्यू
मालेगाव : गिगाव (ता. मालेगाव) येथील गायत्री ज्ञानेश्वर मोरे (वय २२) या गरोदर विवाहितेला प्रसुतीसाठी वडील शामराव वामन दळवी यांनी येथील सामान्य रुग्णालयात १२ मेस दुपारी साडेबाराला दाखल केले. सायंकाळी सव्वासहाला गायत्रीने कन्येला जन्म दिला. प्रसुतीदरम्यान गायत्रीस झटके आल्याने तिच्या प्रकृतीत बिघाड झाला. औषधोपचारादरम्यान १३ मेस मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉ. मदिहा यांनी तपासून तिला मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली.
----
पवारवाडी भागात
तरुणास मारहाण
मालेगाव : येथील पवारवाडी भागातील राज मधुकर थोरात (वय १९) याने त्याचा मेहुणा मोहन दादाजी शिरसाठ (रा. शिवाजी नगर) याची दुचाकी नेली. या कारणावरुन मोहनने राज व त्यांचे वडीलांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजचा मोठा भाऊ दंगल हा भांडण सोडविण्यास गेला असता त्यास मोहन, गोरख साळवे (रा. नाशिक), किशोर शिरसाठ (रा. शिवाजीनगर, कॅम्प) यांनी मारहाण केली. किशोरने लोखंडी दांड्याने मारुन दुखापत केली. १२ मेस राजच्या घरासमोर हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.