टुडे पान १ वर घ्यावी.
-----
जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत
-------------------------------------
सोमवारी गिरणातून मालेगावला पाणीपुरवठा बंद
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १४ : वीज महावितरण कंपनीकडून १८ मेस गिरणा पंपिंग स्टेशनला विज पुरवठा करणाऱ्या दहीवाळ उपकेंद्र ३३ के.व्ही.चे एक्स्प्रेस लाईनचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी १८ मेस पाणीपुरवठा होणार नाही. १८ मेस होणारा पाणीपुरवठा १९ मेस तसेच १९ मेस होणारा पाणीपुरवठा २० मेस केला जाणार आहे.
शहरातील ७१ एमएलडी जलशुध्दीकरण केंद्र येथुन येणारी १२०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी ही सहारा हॉस्पिटल (उड्डाण पुलाजवळ) जवळ मोठ्या प्रमाणात लिकेज झालेली आहे. सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. शहरातील दोन उंच जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामांसाठी १८ मेस संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करुन शट डाऊन घेण्यात आलेला आहे. दुरुस्तीचे काम १८ मेस होणार असल्याने ज्या भागात १८ मेस नियोजित पाणी पुरवठा होणार होता त्या भागात १९ मेस पाणीपुरवठा होईल. १९ मेस ज्या भागात नियोजित पाणीपुरवठा होणार होता त्या भागात २० मेस पाणीपुरवठा केला जाईल. महावितरण कंपनी कडील नियोजित देखभाल दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर व जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर गिरणा पंपिंग स्टेशन येथुन नियोजनाप्रमाणे दोन दिवसाआड पध्दतीने पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. नागरीकांनी पाणी जपून वापरावे. तसेच वरील तांत्रिक अडचण लक्षात घेवून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.