३८ वर्षीय पोलिसाची आत्महत्या

३८ वर्षीय पोलिसाची आत्महत्या
Published on
15066 अशोक गावीत ----- मालेगावला पोलिसाची आत्महत्या मालेगाव : येथील मोची कॉर्नर भागातील पोलिस लाईन बी बिल्डींग मधील रुम नं. ५ मध्ये ३८ वर्षीय महामार्ग वाहतूक पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. घोटी येथे कार्यरत असलेले अशोक तुकाराम गावीत १३ तारखेला त्यांची ड्युटी बजावून येथे आले हाेते. दोन दिवस झाले तरी ते फोन उचलत नसल्याने त्यांच्या वडिलांना चिंता वाटली. त्यांनी मालेगाव येथे येवून घर गाठले. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. पोलिस कॉलनीतील रहिवासी यांनी अनेक वेळा त्यांना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडला. त्यांच्या खोलीत ते गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आले. या प्रकरणी तुकाराम गावीत यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com