नाजिया ईलाही हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा- सुफी नुरुलऐन साबरी

नाजिया ईलाही हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा- सुफी नुरुलऐन साबरी
Published on
फोटो -15320 मालेगाव : अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांना निवेदन देताना नुरुलऐन साबरी नाजिया ईलाही हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा : सुफी नुरुलऐन साबरी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २३ : इंस्टाग्रामवर रील बनवत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथीत आक्षेपार्ह व मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्यात आले. या प्रकरणी इंस्टाग्रामवर दिव्यासिंग४०४३ या अकाउंटवरून आक्षेपार्ह व्हिडीओ नाजिया ईलाही हिने अपलोड केले आहेत. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऑल इंडिया सुन्नी जमितुल इस्लामचे राष्ट्रीय अध्यक्ष सुफी नुरुलऐन साबरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पाेलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची भेट घेत निवेदन सादर केले. सोशल मिडीयावर नाजिया ईलाही हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याची शासनाने दखल घ्यावी. सदरील व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने समाजात तणाव व धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओवर अनेक मुस्लीम बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्या व व्हिडिओ अपलोड करणाऱ्याची चौकशी व्हावी. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनावर सुफी नुरुलऐन साबरी, हाफीज मोहम्मद इस्माईल, मौलाना इम्तियाज कादरी, हाफीज फैसल, सुफी जमील, हाफीज जाकीर, सुफी इरफान, हाजी नासीर, शफीक रिजवी, मौलाना मुक्तार, हकीम नईमुर रहेमान, फय्याज कादरी, अब्दुल अजीज, फिरोज अश्रफी, सुफी अनिस चिश्‍ती, रमजान अब्बास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com