झाेडगे येथील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

झाेडगे येथील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण
Published on
फोटो -15323 मालेगाव : आमरण उपोषणास बसलेले डॉ. रवींद्र पाटील, समवेत निखील पवार. ---- ॲंकर झाेडगेतील अतिक्रमण निर्मूलनासाठी उपोषण ------------------------------------ शासकीय जागेवर ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणाचा आरोप सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २३ : झोडगे (ता. मालेगाव) येथील गट नंबर ११६६ अ व ब पैकी २००० चौरस फूट शासकीय जागेवर ग्रामपंचायतीने बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या संदर्भात न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिले तरी अतिक्रमण काढले जात नाही. न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहेे. त्यामुळे येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७१ वर्षीय डॉ. रविंद्र पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अप्पर जिल्हाधिकारी व तहसिलदार अतिक्रमण का काढत नाही असा आंदोलक सामाजिक कार्यकर्त्यांंचा प्रश्न आहे. झोडगे ग्रामपंचायतर्फे बेकायदेशीर बांधकाम करून गाळे काढले. त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याठिकाणीच सार्वजनिक वाचनालय असून विद्यार्थ्यांना छोट्या गल्लीतून प्रवास करावा लागताे. मालेगाव येथे अप्पर जिल्हा व जिल्हा सत्र न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील अधिकारी न्यायालयाचा आदेश मानत नाहीत का असा सवाल उपस्थित केला. मालेगाव येथे डॉ. पाटील हे दोन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. तरी देखील प्रशासन त्याची दखल घेत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते निखील पवार यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाला शहरातील अनेक संघटनांनी समर्थन केले आहे. यावेळी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, डॉ. शंकर पवार, पिंटू पाटील, प्रशांत शिंदे, शंकरराव मस्के, मराठा महासंघाचे भरत पाटील, आर. डी. निकम आदी उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com