व्हॉटसॲपवर बदनामी करणाऱ्याविराेधात गुन्हा दाखल

व्हॉटसॲपवर बदनामी करणाऱ्याविराेधात गुन्हा दाखल
Published on
व्हॉटसॲपवर बदनामी विराेधात गुन्हा दाखल मालेगाव, ता. २३ : येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार हे चलाे राळेगण सिध्दी या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन आहेत. त्या गृपमध्ये आर्वी येथील विलास पाटील यांनी त्या गृपला धुळ्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याविरोधात अर्वाच्च शब्दांचा उपयोग केल्याने कॅम्प पोलिस ठाण्यात आर.पी.कुवर यांच्या तक्रारीवरुन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार आर. पी. कुवर निवृत्त नायब तहसीलदार असून त्यांचे चिरंजीव धुळे येथे प्रांताधिकारी आहेत. कुवर हे चलो राळेगण सिध्दी या व्हॉटसॲप गृपला जॉईन असून त्या गृपमध्ये विलास पाटील यांनी तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात चुकीचा शब्द वापरुन त्यांची बदनामी केल्याची तक्रार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com