दीड लाखाचा गुटखा जप्त

दीड लाखाचा गुटखा जप्त
Published on
दीड लाखाचा गुटखा जप्त कॅम्प पोलिसांची कामगिरी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २४ : येथे नामपूरहून गुटखा येत असल्याची माहिती मिळाल्यावरुन कॅम्प पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गुटख्यासह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम यांनी पथक तयार करीत सापळा रचला. नामपूर रस्त्यावर वाहनांची तपासणी केली. यात टोयटा कंपनीची कार (एमएच ०१ बीबी ९३५३) ताब्यात घेतले. यामध्ये १ लाख ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी दोन लाखाची कार असा तीन लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक शहजाद अहमद मोहम्मद साजीद (वय ३३), मोमीन निसार अहमद सिराज अहमद (वय ५१, दोघे रा. गोल्डननगर) यांना अटक केली आहे. पोलिस हवालदार हिरामण अहिरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार दीपक हेंबाडे तपास करीत आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com