अपघातात चालकाचा
झोडगे भागात मृत्यू
मालेगाव : मुंबई - आग्रा महार्गावरील झोडगे शिवारात सीएनजी पेट्रोलपंपाजवळ मालट्रक (एमएच १८ बीएच ४०१६) ही बंद अवस्थेत उभी होती. रात्रीच्या वेळेस मालट्रक चालक राजू दयाराम साहू (रा. सेंधवा, मध्यप्रदेश) याने कोणतेही इंडीकेटर न लावता ट्रक रस्त्याच्या मधोमध उभी केली. पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीचा ट्रकने (एचआर ६१ ई ४६९३) बंद ट्रकला धडक दिली. यात चालक इस्माईल खान नबी अहमद (वय ३२, रा. हातीन, जि. मेवात) हा गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या बॉबी रामबाबू मौर्या हा जखमी झाला. राहुल शर्मा यांच्या तक्रारीवरुन मालट्रक चालक राजू साहू याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सटाणा नाक्याहून
दुचाकी चोरीला
मालेगाव : येथील सटाणा नाका भागातील अमय लॉन्सच्या गेटमधून संजय काशिराम भदाणे (रा. मालेगाव) यांची दुचाकी (एमएच ४१ के ९४२८) चोरट्यांनी चोरुन नेली. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----
२० हजाराची
दुचाकी लंपास
मालेगाव : येथील टिळक नगर भागातील गल्ली नं. २ मधील गोकुळ शामराव खैरे (वय ५५) यांची २० हजाराची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच २० एएम ७८८८) चोरट्यांनी चोरुन नेली. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----