फोटो -15344
मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक भारत भगत यांना निवेदन देतांना ओबीसी संघटना व महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी
----
निवडणूक आरक्षणात ओबीसी’वर अन्याय
महात्मा फुले परिषद, ओबीसी संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २५ : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या आरक्षण प्रक्रियेत ओबीसी (इतर मागासवर्गीय) असा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणुका स्थगित ठेवाव्यात, अशी मागणी ओबीसी संघटना व महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील आरक्षण आदेशात ओबीसी अथवा इतर मागासवर्गीयांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. या आदेशाविरोधात न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून निकाल लागेपर्यंत निवडणूक प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश उचित यांनी प्रास्ताविक केले. नितीन शेलार यांनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. समता परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, राजेश वैद्य, चेतन महाले, संजय दोडे, रवींद्र चौधरी, जितेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर भांडारकर, सतीश बोरसे, संजय लाडके, बापू वाघ, अरुण सोनटक्के, रमेश जगताप, जयघोष जाधव, भाऊसाहेब जाधव यांच्यासह तालुक्यातील ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक भारत भगत यांना निवेदन देण्यात आले.