शाहू महाराजांना
महानगरपालिकेत अभिवादन
मालेगाव : मौलाना अबुल कलाम आझाद भवन, मनपा मुख्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त जाधव यांनी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या विचारांनी आपल्या जीवनात बदल घडवून आणल्याचे नमूद केले. उपस्थित असलेल्या सर्वांनी शाहू महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. यावेळी सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी संतोष गायकवाड, विद्युत अधीक्षक संतोष अहिरे, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, गजानन बन्नापुरे, अविनाश वाघ, शकील अहमद अन्सारी, गणेश गवळी, छायाचित्रकार गौरव पवार उपस्थित होते.
--