घात - अपघात

घात - अपघात
Published on
विजेचा धक्का लागून चिमुरड्याचा मृत्यू मालेगाव : साकुरी (ता. मालेगाव) येथील मल्हार भाऊसाहेब आयरन (वय ११ महिने) या चिमुरड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ४) सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरात ही घटना घडली. नातेवाईक गोविंदा तोरे यांनी मल्हारला सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता पवार यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू मालेगाव : मनमाड चौफुलीजवळ सिमा हॉटेलसमोरील गतिरोधकावर आयशरची दुचाकीला धडक बसून नेहा अनिल बागुल (रा. वलवाडी शिवार, धुळे) यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार अक्षय राजेंद्र नागपुरे (रा. येवला) गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ४) अक्षय व नेहा दुचाकीने (एमएच १५ जेजी ६९०८) मालेगावकडे येत असताना आयशर (आरजे ४१ जीए ५४२६) ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. नेहा यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नील अनिल बागूल यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलिस ठाण्यात आयशरचालक सोमलाल जगदीशप्रसाद यादव (वय ५०, रा. केसरगड रेडवा, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी तरुणाचा गिरणा नदीपात्रात मृत्यू मालेगाव : अकरा हजार कॉलनीजवळील कचरा डेपो परिसरातील गिरणा नदीपात्रात शुक्रवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास ३२ वर्षीय अनोळखी तरुण बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णवाहिकाचालक मोहम्मद फारुख अहमद यांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. फैजी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. किल्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com