रिलीफ फंडाला ११ हजाराची मदत..

रिलीफ फंडाला ११ हजाराची मदत..
Published on
फोटो : १५८१२ मालेगाव : सकाळ रिलिफ फंडाला धनादेश देताना मालेगाव तालुका पेन्शनर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी. रिलिफ फंडाला ११ हजारांची मदत सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ७ : नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ’ने मदतीसाठी आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत मालेगाव तालुका पेन्शनर असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ११ हजारांचा धनादेश ‘सकाळ’चे प्रतिनिधी जलील शेख यांच्याकडे सुपूर्द केला. ‘सकाळ’तर्फे सकाळ रिलिफ फंडाला मदत करा, असे आवाहन केल्यानंतर येथील मालेगाव तालुका पेन्शनर असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष वाय. जी. अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. बैठकीत एकमताने ‘सकाळ रिलिफ फंडा’ला ११ हजार रुपयांचे मदत करण्यास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. सटाणा नाका भागातील ज्येष्ठ नागरिक भवन येथे रविवारी (ता. ६) संघटनेतर्फे अकरा हजारांचा धनादेश देण्यात आला. या वेळी इंदुमती व रामदास सोनू अहिर या दांपत्यांनीही एक हजाराचा धनादेश ‘सकाळ रिलिफ फंडा’ला दिला. दोन दशकांपासून ‘सकाळ रिलिफ फंडा’ला तालुका पेन्शन असोसिएशनतर्फे मदत केली जाते. अध्यक्ष वाय. जी. अहिरराव, वाय. वाय. शेख, हरी सावंत, शिवाजी पवार, अन्सारी फय्याज, प्रकाश कुलकर्णी, विक्रम पाटील, श्रीकृष्ण पुरकर, डी. एन. जगताप, कृष्णा देवरे, अशोक निकम, बाळासाहेब निकम, अब्दुल मजीद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठांना डिजिटलची माहिती स्टेट बँकेचे मुख्य शाखा प्रबंधक सचिन कुलकर्णी यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार नाहीच, पोलिस व न्यायालयातर्फे व्हॉट्सॲप कॉल कधीही केले जात नाहीत, असे कॉल आल्यावर त्यांना प्रत्युत्तर देऊ नका. ‘फेक कॉल’वर कोणालाही ओटीपी व बँकेच्या डिटेल शेअर करू नका, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com