पोलिसपाटलाला मारहाण
प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : अजंग येथील भवानी टेकडीजवळील पेट्रोलपंपाजवळ काष्टीचे पोलिसपाटील योगेश प्रल्हाद देसले (वय ३४) यांना तिघांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. बबलू टायर दुकानदाराने फोन करून देसले यांना पेट्रोलपंपाजवळ बोलावले. तेथे एका महिलेने मुलगा बबलू दारू विक्री करीत असल्याचे पोलिसांना का सांगितले, अशी कुरापत काढून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
क्रुझरच्या धडकेत
महिलेचा मृत्यू
मालेगाव : अजंग-पिंपळगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ क्रुझरने ॲपेरिक्षाला दिलेल्या धडकेत अलकाबाई फकिरा अहिरे यांचा मृत्यू झाला. अलकाबाई ॲपेरिक्षातून (एमएच ४१ सी ८६५१) प्रवास करीत होत्या. पाठीमागून आलेल्या क्रुझरने (एमएच १९ बीपी ३९६८) धडक दिल्याने त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात क्रुझरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्कार्पिओच्या धडकेत
पिता-पुत्र जखमी
मालेगाव : चौकटपाडे-निमगाव रस्त्यावरील भगवंत पेट्रोलपंपाजवळ स्कार्पिओने दुचाकीला धडक दिल्याने कैलास पंढरीनाथ पारखे (वय ६५) व त्यांचा मुलगा संदीप जखमी झाले. दोघे होंडा शाईन दुचाकीने (एमएच ४१ एआर ८३७७) निमगावकडे जात होते. समोरून आलेल्या स्कार्पिओने (एमएच ४१ बीएच ५३३९) धडक दिली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चालक नीरज प्रेमचंद पारख (रा. निंबायती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.