मालेगाव कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे पाच नवजात बालकांचा सन्मान

मालेगाव कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे पाच नवजात बालकांचा सन्मान
Published on
पान-३ अँकर फोटो -15899 मालेगाव : महिला बालरुग्णालयात नवजात बाळ व आईला साहित्यवाटप करताना अध्यक्ष मोहन कांबळे. गणेशोत्सव समितीतर्फे पाच नवजात बालकांचा सन्मान ‘गणेश बालजन्म सोहळ्या’तून सामाजिक बांधिलकीचा संदेश सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १६ : येथील कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ‘गणेश बालजन्म सोहळा’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गणेश स्थापनेच्या शुभमुहूर्तावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बाल रुग्णालयात जाऊन नुकत्याच जन्मलेल्या पाच नवजात बालकांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. समितीचे अध्यक्ष मोहन कांबळे यांच्या संकल्पनेतून गेल्या दशकभरापासून हा उपक्रम राबविला जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या नवजात बालकांचे स्वागत करण्यात येते. यावेळी बालकांच्या गळ्यात चांदीचे गणेशाचे लॉकेट, मातांना साडी, बालकांना बेबी किट, मिठाई, फळे व इतर भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सतीश बेडेकर, उपकार्याध्यक्ष विजय चांदणे, उपाध्यक्ष अंशूराज राऊत, सतीश जाधव, सचिव संजय लाडके, सहसचिव प्रणित दिवरे व अमोल राणे, खजिनदार स्वप्निल बच्छाव, उपखजिनदार हिम्मत अहिरे, प्रसिद्धीप्रमुख ओम गाडेकर, कायदेशीर सल्लागार ॲड. मुकुंद शिंदे, विजयाताई माळी, कार्यालयप्रमुख विशाल गायकवाड, मुख्य सल्लागार चेतन अहिरे, लोकेश चव्हाण यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोट : गणरायाच्या आगमनाबरोबर नवजात बालकांचे स्वागत करण्याचा उपक्रम गेल्या दशकभरापासून सुरू आहे. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य यासाठी लाभते. मातांचे प्रेमपूर्वक स्वागत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. - मोहन कांबळे, अध्यक्ष, मालेगाव कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समिती फोटो- 15899

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com