घात - अपघात

घात - अपघात
Published on
तरुणाचे अपहरण करुन मालेगावला खूनाचा प्रयत्न मालेगाव : अमन चौक परिसरातून मोहम्मद कामरान अब्दुल मजीद (वय १९, रा. सलीम मुन्शीनगर) याला फैसल हुसेन मोहम्मद अस्लम (वय २६, रा. बागे मेहमुद, संगमेश्वर) व त्याच्या एका साथीदाराने दुचाकीवरून नेऊन बागे मेहमुद परिसरातील घरात डांबून ठेवले. तेथे बेल्ट व हाताने मारहाण करून त्याचा इच्छेविरुद्ध व्हिडीओ तयार करण्यास सांगितले. नकार दिल्याने फैसलने चाकूने पोटात वार करण्याचा प्रयत्न केला. चाकू पाठीमागील बाजूस लागल्याने कामरान जखमी झाला.त्यानंतर त्याला बंद खोलीत डांबून ठेवून आरोपीच्या साथीदाराला पहाऱ्यावर ठेवण्यात आले. यावेळी आलेल्या अनोळखी मुलीला मिठी मारण्यास सांगितले असता कामरानने नकार दिला. त्यानंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आरोपींच्या सांगण्यानुसार त्याचा व्हिडीओ तयार करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. १२ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते रात्री आठदरम्यान हा प्रकार घडला. आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार मालेगाव : नामपूर-मालेगाव रस्त्यावर वडनेर शिवारातील कोठरे नाल्याजवळ दोन दुचाकींच्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. चेतन गणेश खैरनार (वय २३, रा. पाटणे, ता. मालेगाव) हे यामा दुचाकीने (एमएच ४१ बीएस १८८३) जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच १६ बीएस ७२११) त्यांना धडक दिली. १३ सप्टेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चेतन यांचा मृत्यू झाला. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सवंदगाव परिसरात दीड लाखांचे मांस जप्त मालेगाव : सवंदगाव रस्त्यावरील म्हाळदे शिवारात मुस्तफा मेंबर यांच्या घराजवळ पोलिसांनी छापा टाकून एक हजार किलो मांस व ८० हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच ४१ एडी ८७८६) असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शाहरुख मोहम्मद रिजवान, मुद्दसिर अफरोज अहमद, आल्फेज अहमद इम्रान अहमद, आमीर खान लियाकत खान, अर्शद शेख गुलाम रसुल, आसिफ अली सलीम अहमद व मुस्ताक मेंबर यांच्याविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताक मेंबर फरार आहे. बेशुद्धावस्थेतील व्यक्तीचा मृत्यू मालेगाव : पिंपारपाडा (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील आबा त्र्यंबक लचके (जाट) (वय ४५, रा. रामनगर) हे सोमवारी (ता. १४) देवारपाडे (ता. मालेगाव) शिवारातील अनुसयाबाई विक्रम चिकणे यांच्या शेतात सकाळी अकराच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. आमीर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com