फोटो - १५९०४
मालेगाव : पुरवठा अधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेसचे शिष्टमंडळ.
-------
शिधापत्रिकेत नावे
वाढवावीत ः इंजिनिअर
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १६ : शहरात मृत व्यक्तीची नावे शिधापत्रिकेतून कमी केली जात आहे. मात्र नवीन नावे वाढविली जात नाही. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने शहरात १० हजार युनिट धान्य आले. सदरील धान्यात गैरव्यव्यवहार झाल्याच्या अंदाज आहे, याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इम्रान इंजिनिअर यांनी केली. यासंदर्भात धान्य पुरवठा अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात पांढऱ्या व केसरी शिधापत्रिका ऑनलाइन केल्या जात नाही. याठिकाणी दलालांच्या सुळसुळाट वाढला आहे. शिधा पत्रिकेमुळे अनेक रूग्णांना मोफत उपचार मिळतो. शिधापत्रिका ऑनलाईन नसल्याने त्यांना दाखले दिले जात नाही. हद्द वाढ झालेल्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने वाढवावी. यासहविविध मागण्या त्यांनी केल्या आहे. मागण्या मान्य झाल्यास आंदोनल करू असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर इम्रान इंजिनिअर, जैनू पठाण, समीर सूर्यवंशी, हारून रशीद, मयूर वांद्रे, अब्दुल गफ्फार, अशफाक अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.