पान-३ मेन
फाेटो- १५९०५
नांदगाव बुद्रुक ः जखमी निर्मला सोनवणे
------------
नांदगाव बुद्रुक येथे दरोडा
चौघांकडून तिघांना मारहाण; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १६ : मालेगाव तालुक्यातील वाके रस्त्यावरील नांदगाव बुद्रुक येथे चौघा भामट्यांनी दरोडा टाकत घरातील साडेतीन लाखांचा मुद्देमाल लांबविला. या प्रकरणी चाैघांनी वखरण्याची लाेखंडी पासने तिघांना मारहाण करून त्यांच्या आंगावरील सोने लंपास केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे वाकेसह परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदगाव बुद्रुक (ता.मालेगाव) येथे प्रकाश गंगाधर सोनवणे (वय ५२) घरात झोपलेले असताना ३० ते ४० वयोगटातील चार अनोळखींनी त्याच्या घरात जबरदस्तीने घुसुन प्रकाश यांच्या आई राजूबाई गंगाधर सोनवणे (वय ७५) व प्रकाश यांच्या पत्नी निर्मला सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चैन, टोंगल, मंगलसूत्र, डोरले जबरदस्तीने काढले. या वेळी महिलांनी विरोध केल्यावर दरोडेखाेरांना तिघांना शेतात वखरणी करणाऱ्या लोखंडी पासने डोक्यावर, हातावर मारहाण करुन जखमी केले. तसेच घरात शिरून सोनवणे यांच्या कपाटातील ८५ हजारांची रोकड, घरातील चार मोबाईल असा तीन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप स्वामी, अप्पर पाेलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, रघुनाथ शेगर, प्रीती सांवजी, तुषार भदाणे यांनी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तालुका पलिसांचा त्या अनुषांने तपास सुरू आहे.
-------------
चौकट
परराज्यातील सराईत गुन्हेगार
दरोडा टाकणारी टोळी आपसांत परराज्यातील भाषा बोलत होते. त्यामुळे सोनवणे व परिवाराला त्यांची भाषा समजत नव्हती. या भागात मोठ्या प्रमाणात मळे आहेत. या मळ्यांत नागरिक राहतात. सोनवणे यांच्याकडेच का दरोडा पडला, याची पार्श्वभूमी तपासली जात आहे. कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांदे, मका लावणी व काढणीसाठी परराज्यातील मजूर येतात. सोनवणे यांचे मजुरांसोबत भांडण तर झाले नव्हते ना, त्याचा बदला घेतला असावा, अशी चर्चा सुरू आहे. या दरोड्यात पाच ते सहा जण असल्याचा संशय आहे. यासंदर्भात तालुका पोलिसांनी महामार्गावरील तसेच वाके व नांदगाव बुद्रुक परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. यातील सर्व संंशयित सराईत असल्याचे बोलले जात आहे.