रोटरी मिडटाऊनतर्फे १३ शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ने होणार सन्मान

रोटरी मिडटाऊनतर्फे १३ शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ने होणार सन्मान
Published on
15911 ------ रोटरी मिडटाऊनतर्फे अ.का पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर १३ शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ने होणार सन्मान सकाळ वृत्तसेवा सोनज, ता. १७ : शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यपक अ. का. पाटील, यांना रोटरी मिडटाऊनतर्फे ‘रोटरी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यासह तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात अतुलनीय काम करणाऱ्या १३ शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी (ता.२१) कॅम्प परिसरातील रोटरी हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देशप्रेमाची भावना रुजविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन यांच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून क्लबच्या वतीने हा तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात अतुलनीय काम करणारे शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित केल्याने इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजक सुमित बच्छाव व भावेश अमृते यांनी केला. पुरस्कार समितीमध्ये रविंद्र जटिया, प्रा. डॉ. अनिल सावळे, अनिल सोळुंके व भूषण कदम यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष राजेंद्र जाधव आणि सचिव राहुल कदम यांच्यावतीने करण्यात येत आहे. ------ पुरस्कारार्थी शिक्षक नुतन पाटील (जि. प.शाळा, वडेल), अमोल नहीरे (जि. प. शाळा, दूंधे), ज्योत्स्ना काकळीज (जि. प. शाळा, चिंचगव्हाण), निर्मला वाणी (उत्कर्ष प्राथमिक विद्यालय), तुषार शेळके (जि. प. शाळा, झाडी), राजु बच्छाव (समता विद्यालय, टेहरे), अर्चना पाटील (जि. प. शाळा, करंजगव्हाण), शारदा पाटील (जि. प. शाळा, सावतावाडी), ललितकुमार रोहिदास (टी. के. आर. एच. विद्यालय, निमगाव), प्रिती पाटील (विशेष शिक्षिका, शिक्षण विभाग, मनपा मालेगाव), भिका मंडळ (जनता विद्यालय, वजीरखेडे), श्रेयशा वाघ (सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा), निशा शिंदे (बालसंस्कार, करंजगव्हाण).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com