बारा मेंढ्यांचा वीषबाधेने मृत्यू

बारा मेंढ्यांचा वीषबाधेने मृत्यू
Published on
साजवहाळ शिवारात बारा मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेची शक्यता; नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १७ : तालुक्यातील साजवहाळ येथे शेतकरी पांडुरंग मोगल यांच्या १२ मेंढ्या अचानक दगावल्या आहेत. या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत शेवणकर व डॉ. कैलास शिंदे यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन काही नमुने हे पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगितले. साजवहाळ (ता. मालेगाव) येथील शेतकरी पांडुरंग धर्मा मोगल व त्यांचा मुलगा मयूर मोगल हे शेतीसोबत मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह मेंढ्यांवर आहे. त्यांच्याकडे ५० मेंढ्या आहेत. त्यापैकी १२ मेंढ्या मृत अवस्थेत मिळून आल्याने मोगल यांचे मोठे नुकसान झाले. यातच साजवहाळ भागात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नाही. शेतातील पिके करपु लागली आहेत. १२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती समजातच वैद्यकीय अधिकारी शेवणकर व शिंदे यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. तसेच या मेंढ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी नमुने हे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ---- दुष्काळी परिस्थितीत १२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी. एकीकडे पाऊस पडत नसल्याने मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. - पांडुरंग मोगल, शेतकरी, साजवहाळ ------ मेंढ्यांचा शवविच्छेदन अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मेंढ्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजेल. - डॉ. डी. डी. गुंड तालुका पशुवैद्यकीय व दुग्ध व्यावसायिक विकास अधिकारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com